विजय गंगणे यांच्या संकल्पनेतून ९ वर्षापासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह

विजय गंगणे यांच्या संकल्पनेतून ९ वर्षापासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

शहरातील पापनास तीर्थ परिसरातील विवेकानंद नगर येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे महंत श्री तुकोजीबुवा यांच्या शुभहस्ते रविवार दि १९ जानेवारी रोजी सुरुवात केली.

कृषी उपन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे मित्र मंडळाच्या नियोजनपूर्वक देणगी मुक्त अखंड हरिनाम सप्ताह मागील नऊ वर्षापासून आखंड आज पर्यंत चालू आहे.

नियोजनपूर्वक देणगी मुक्त अखंड हरिनाम सप्ताह मागील ९ वर्षा पासून आखंड चालू आहे. या सप्ताह्याचे रविवारी सकाळी महंत तुकोजी बुवा यांच्या शुभहस्ते श्री कलश ग्रंथ व्यासपीठ श्रीराम प्रतिमा टाळ मृदंगाची पूजन करून सप्ताह्यास सुरुवात झाली आहे.

रोजा आखंडपणे काकड आरती भगवत गीता हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन धार्मिक गीत गायन व तसेच रात्री प्रसिद्ध कीर्तनकार यांचे सुश्राव्य कीर्तन सात दिवस चालणार आहे. तसेच ह.भ.प वैभव महाराज कानेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने रविवार दि.२६ जानेवारी रोजी सप्ताहाची महाप्रसादाने सांगता होणार आहे. तरी तुळजापूर तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा आसे आव्हाण माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे विजयसर गंगणे यांनी केले आहे.
या सप्ताह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मनोज आप्पा गवळी, सुशांत हत्तीकर,प्रहर्ष बरुरकर,ताती कदम,आकाश माने,अश्रू माने,उत्कर्ष डोंगरे,दादा दळवी,विलास रेणके,अभिजीत रेणके,बापू वैरागे ,दादा कदम, खानदेश वाघमारे तसेच सर्व पापनास नगर मधील जेष्ठ व प्रोंढ नागरीकांनी पापनास तीर्थ भजनी मंडळ हे सर्व अहोरात्र परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!