डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी लढवय्या , अभ्यासू पत्रकार अयुब शेख यांची निवड

डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी लढवय्या , अभ्यासू पत्रकार अयुब शेख यांची निवड

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथील लढवय्या , अभ्यासू पत्रकार तथा एनटीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी आयुब शेख यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी तुळजापूर येथील शासकीय निवासस्थानी रविवार १९ जानेवारी रोजी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी त्यांना नियुक्तीपत्र , शाल श्रीफळ , पुष्पहार , पुष्पगुच्छ देऊन सदरची निवड केली आहे यावेळी प्रदेशउपाध्यक्ष सतीश सावंत , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले , राज्य समन्वयक इकबाल शेख हे प्रमुख उपस्थितीत होते राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांना येणाऱ्या अडचणी , समस्या सोडवून युवा पत्रकारांना मार्गदर्शन करावे व संघटनेची ध्येय धोरणे पत्रकारांना समजावून सांगावीत व संघटना वाढवावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आयुब शेख यांनी शहरी व ग्रामीण भागात धडाकेबाज बातम्या , प्रशासन विरोधात आक्रमक भूमिका व काही सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करून शेतकरी , शेतमजूर , पीडित , शोषित , वंचित , दीनदुबळ्यांचे प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व प्रशासनासमोर मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्यांची या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्यातुन अभिनंदन केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!