पालकमंत्री व शिवसेना उपनेते माजी आ.चौगुले यांच्या उपस्थित जाधव यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाला एकावर एक धक्के बसत आहे. आता धाराशिव येथील शिवसेना उबाटा गटाचे अमोल शिवाजीराव जाधव यांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार- ज्ञानराज चौगुले, धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री व शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये दि.२० जानेवारी रोजी मुंबई ठाणे येथे शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड मजबूत करणार तसेच जगामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नाव कसे लौकिक होईल याच्या प्रयत्न करेन असल्याचे दैनिक जनमतशी बोलताना सांगितले.राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाटा यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.