जय मल्हार पत्रकार संघाचे कार्य कौस्तुकास्पद सद्गुरू औसेकर महाराज
अणदूर : प्रतिनिधी
शेतकरी, कष्टकरी, सामाजिक क्षेत्राची जाण असलेला वयाचे 90 पार केलेल्या दिप स्तंभांचा कृतज्ञता सोहळा यांचे आयोजन करणाऱ्या जय मल्हार पत्रकार संघाचे कार्य कौस्तुकास्पद असल्याचे गौरव उद्गार विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचे सह अध्यक्ष सद्गुरु हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.
येथील हुतात्मा स्मारकात जय मल्हार पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन व 90 वर्षे पूर्ण झालेल्या दीपस्तंभ चा कृतज्ञता सन्मान सोहळा व सत्कार प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणा जगजीत सिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,सरपंच रामचंद्र आलूरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार,श्री श्री गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे, मा. जि प सदस्य महादेव आप्पा आलूरे, तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण,आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अणदूर चे दिपस्तंभ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, बाबुराव कुलकर्णी, नीलकंठ नरे, रोहिणी बाई घोडके यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल फेटा सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
समाजात माणसे येतात आणि जातात, मात्र बोटावर मोजण्या इतकेच माणसे कायम जनमानसात ओळख ठेवतात. त्यांचाच हा आदर्श युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे निव्वळ पैसा आणि प्रतिष्ठा मुळे माणूस मोठा ठरत नसून त्याच्या कार्यकर्त्यावर त्याचे लौकिक अवलंबून असून जय मल्हार पत्रकार संघ विविध समाज उपयोगी व दिशादर्शक उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श घालून देण्याचे काम निश्चितच गौरवशाली व प्रेरणादायी असल्याचे सांगून संघाचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री चव्हाण म्हणाले की, ग्रामपंचायत सदस्य ते मंत्री पदापर्यंत कार्य करण्याची संधी मला तालुक्यातील दिली. विशेषतः ग्रामस्थांचे उपकार विसरू शकत नसल्याचे सांगून स्वर्गीय आलुरे गुरुजी व मी दोघांनी जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेतृत्व केले आज घ डीला तिसरी पिढी राजकारण काम आणि समाजकारण अधिक काम करीत असून त्याला प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे विशेष काम पत्रकार करीत असल्याचे प्रशंसा यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, शिवयोगी शिवाचार्य महास्वामी, सरपंच रामचंद्र आलूरे, यांनीही मनोगत व्यक्त करून संघाच्या कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमास अॅड. दिपक आलूरे,नितीन काळे, ऋषी मगर, महादेव मुळे, डॉ. चिंचोले, श्रीमंत मुळे, धनराज मुळे, सिध्दाराम धमुरे, अरुण दळवी, मल्लीनाथ जेवळे, अरविंद घोडके, बाळकृष्ण घोडके, माणिक कार्ले आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर तिरगुळे, सुत्रसंचालन प्रा.डा.संतोष पवार तर आभार शिवाजी कांबळे यांनी मानले.सन्मान पत्राचे वाचन चंद्रकांत गुड्ड यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे, श्रीकांत अणदूरकर,दयानंद काळूंके, सचिन तोग्गी,संजीव आलुरे यांनी परिश्रम घेतले.