डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना धाराशिव जिल्हा कार्यकारणी जाहीर

डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना धाराशिव जिल्हा कार्यकारणी जाहीर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्र राज्य डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

तुळजापूर येथील शासकिय विश्रामग्रह येथे दिनांक १९ जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा कार्यकारणीची निवड आणि नियुक्ती यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,सुभाष चिंदे,इकबाल शेख आदींची उपस्थिती होती.

धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी आयुब शेख,जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद राऊत,दिनेश सलगरे,जिल्हा सचिवपदी सचिन बिंद्री, जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर गवळी,कोषाध्यक्षपदी सूरज बागल,जिल्हा संघटकपदी शिवाजी नाईक, तुळजापूर तालुका अध्यक्षपदी प्रदीप अमृतराव, तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र स्वामी,प्रभाकर जाधव, तुळजापूर शहराध्यक्षपदी सचिन ताकमोघे,शहर उपाध्यक्षपदी अमीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्य कार्यकारणी सदस्यपदी अनिल आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!