आंबेडकर चळवळी चे स्वप्निल शितोळे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर येथे दि.१५ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे मुक्ताई बहुद्देशीय सामाजिक संस्था धाराशिवच्या वतीने आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या लढवय्या भीमसैनिक व पँथर नेते यांचा सत्कार सोहळा पार पडला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पँथर नेते राजाभाऊ दादा ओव्हाळ ,प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब जेटीथोर साहेब,विद्यानंद दादा बनसोडे,हरीश डावरे साहेब ,रणजित बप्पा गायकवाड आणि भालचंद्र कठारे साहेब उपस्थित होते.”पँथर योद्धे ” म्हणून राजाभाऊ दादा ओव्हाळ आणि दादासाहेब जेटिथोर यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .त्याबरोबरच समाधान सरवदे,स्वप्नील शितोळे यांचा देखील सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला पँथर नेते राजाभाऊ दादा ओव्हाळ,दादासाहेब जेटिथोर साहेब,हरीश डावरे साहेब यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली .कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप अंकुशराव व आभार प्रदर्शन पँथर नेते भालचंद्र कठारे साहेब यांनी मानले.
