सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख गोपिचंद कदम यांचा
तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळातर्फे सत्कार
तुळजापूर : प्रतिनिधी
स्मार्ट सिटी सोलापूर येथे आमचे मार्गदर्शक कदम बंधू IAS गोपीचंद कदम सरांची विशेष कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत आणि श्री. खाडे साहेब यांच्याकडे खाजगी सचिव म्हणून दमदार कामगिरी केलेली आहे.उपविभागीय अधिकारी,प्रांताधिकारी म्हणून ही काम केलेले आहे.पंढरपूरचे विठ्ठल रूक्मिणी देवस्थान मध्ये ही विशेष कार्य केलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा सोलापूर शहराला निश्चितच फायदा होईल.दि.०६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यालयात शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख तथा श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी श्री तुळजा भवानी देविची प्रतिमा,प्रसाद व पुष्पगुच्छ देऊन सरांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. याभेटी दरम्यान सध्या श्री तुळजा भवानी मंदिरात होत असलेल्या कामासंदर्भात व इतर ही अनेक विषयांवरती चर्चा झाली.

