शहरात प्रथमच महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण;हिंदुगर्जना हे तुळजापूरात पहिले व एकमेव गणेश मंडळ आहे..
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
हिंदुगर्जना हे तुळजापूरात पहिले व एकमेव गणेश मंडळ आहे. जे गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. हिंदुगर्जना ढोल ताशा पथकाच्या वतीने दि.२८ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव व ऋषीपंचमी निमित्त महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण घेण्यात आले..यामध्ये तुळजापूर मधील शंभर महिला व मुली सहभागी झाल्या होत्या..
अशा प्रकारचा उपक्रम घेणारे हिंदुगर्जना हे पहिले व एकमेव गणेश मंडळ आहे..यानंतरही मंडळाच्या सर्व सार्वजनिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे मत अनेक महिलांनी व्यक्त केले आहे..अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सर्व मंडळानी करावे असे मत यावेळी महिलांनी व्यक्त केले.मुलींना मिरवणुकीत सहभागी करून घेणारे पहिले व एकमेव मंडळ असलेले हिंदुगर्जना आता महिलांना देखील सार्वजनिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी करून घेणार आहे..
एक मोठे परिवर्तन हिंदुगर्जनाच्या कार्यातून घडत आहे याबद्दल हिंदुगर्जना मंडळाचे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक केले जात आहे..