आमदाराच्या नावाखाली दररोज 50 पासचा रोज काळाबाजार होत आहे आम आदमी पार्टीचा आरोप
तुळजापूर : प्रतिनिधी
श्री तुळजा भवानी मंदिरात व्हिआयपी पासचा होत असलेला गैरव्यवहार त्वरीत थांबवून भाविकांची होणारी गैरसोय टाळणेबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष मंदिर संस्थान तुळजापूर यांना मंगळवार दि. 31 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले.निवेदनात असे नमूद केले आहे की,महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात व्हिआयपी पासचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह यांच्या नावे दररोज ५० व्हिआयपी मोफत पास त्यांचे राजकीय सहकारी कार्यकर्ते घेऊन प्रत्येकी 2000 ते 2500 ला एक पास विकूण मंदिर संस्थानची व भाविकांची राजरोसपणे फसवणूक होत आहे. यामुळे मंदिर संस्थानची मोठी बदनामी होत आहे. भाविकांना नाहक त्रास होत आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त श्रद्धेने व आपला कुलाचार करण्यासाठी येत असतो. शासनाने तर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख देवस्थानात यात्रेच्या कालावधीत व्हिआयपी दर्शनास बंधणे घातलेली आहेत. असे असताना आमदार यांच्या नावे होत असलेले हे गोरखधंदे त्वरीत बंद करून भाविकांना न्याय द्यावा अन्यथा श्री तुळजा भवानी मंदिरा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनद्वारे देण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष मधुकर शेळके शहराध्यक्ष किरण यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
