
देवेंद्र फडणवीस धाराशिवकरांनी अजून तुम्हाला काय द्यावे ; हा अन्याय कशासाठी धाराशिवरांचा सूर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा तुळजापूर तालुकाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आवडता आणि त्यांचे सर्वाधिक लक्ष असलेला म्हणून धाराशिव जिल्हा राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहे.सन २०१९ मध्ये काँग्रेस मुक्त तुळजापूर करण्याचा भाजपचा नारा यशस्वी झाला आहे. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा आमदार निवडून आला नाही.यंदा हक्काचा पालकमंत्री तुळजापूरकरांना मिळेल अशी अपेक्षा तुळजापूरकर बाळगून होते.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर धाराशिवकरांनी महायुतीचे दोन आमदार राणाजगजीतसिंह पाटील व आमदार तानाजी सावंतनाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळ असलेले आमदार राणाजगजीतसिंह पाटील त्यापैकी एकाला मंत्रिपदाची संधी मिळेल आणि यातीलच एक जण जिल्ह्याचा हक्काचा पालकमंत्री होईल अशी चर्चा संपूर्ण धाराशिव कराना व तुळजापूर कराना ऐकण्यास मिळाली होती.मात्र रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे परंतु धाराशिव जिल्हत एकाही आमदाराला मंत्रीपदाच्या शपथ घेण्यासाठी बोलावले नाही हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. आमदार राणा दादा हे सुद्धा तितक्याच ताकतीचे आमदार आहेत त्यामुळे त्यांचेही नाव नाही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये धाराशिव करांचे कोणत्याही आमदाराचे नाव नसल्याने धाराशिवरांच्या सोशल मीडिया तसेच सर्वत्र प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे देवेंद्र फडणवीस तुळजापूर व धाराशिवरांनी तुमच्यासाठी अजून काय करावे हा अन्याय तुम्ही आमच्यावर का करता असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य तुळजापूर व धाराशिवकर उपस्थित करत आहे.
