तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तुळजापूर येथे गुरुवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीची महापूजा करून साकडे घातले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोठे यश मिळविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हणून अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हावेत या करीता कार्यकर्त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचे महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत कुलस्वामीनी आई तुळजाभवानी देवीची खणानारळाने ओटी भरून महापूजा केली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेश चोपदार, विचार प्रसारक मंडळाचे धाराशिवचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार गवारे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय हुंडेकरी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.