३१ वर्षीय महिलेवर एयर लिडर बनविण्याचे आमीष दाखवून तीच्यावर वारंवार अत्याचार
धाराशिव : प्रतिनिधी
आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एक ३१ वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि.२०/०८/२०२३ ते दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ही घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तिस एयर लिडर बनविण्याचे आमीष दाखवून तीच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार लैंगीक अत्याचार केला. व शिवीगाळ करुन झाल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास कामावारुन काढून टाकण्याची धमकी दिली. यावरुन पिडीत यांनी दि.३० नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-६४,३५२,३५१ (२) (३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.