बचत गट महिलांना मोफत चटई वाटप ;धाराशिव येथे सकल मराठा वधु-वर सुचक समितीचा उपक्रम

बचत गट महिलांना मोफत चटई वाटप ;धाराशिव येथे सकल मराठा वधु-वर सुचक समितीचा उपक्रम

धाराशिव : प्रतिनिधी

धाराशिव सकल मराठा मोफत वधु-वर सुचक समितीच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी मोफत चटई वाटप व मार्गदर्शन मेळावा रविवारी (दि. १४ सप्टेंबर) सकाळी १० वाजता धाराशिव येथे पार पडला. या मेळाव्यास सुमारे ६०० महिलांची उपस्थिती लाभली.

अध्यक्ष व प्रमुख पाहुणे

कार्यक्रमाचे अध्यक्षपद शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी भूषविले.

मोफत चटई वाटपाचा उपक्रम भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडला.

मान्यवरांचा सहभाग व सत्कार

या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांचा सकल मराठा मोफत वधु-वर सुचक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

महिलांसाठी मार्गदर्शन

मेळाव्यात महिलांना बचत गटांचे महत्त्व, आर्थिक स्वावलंबन, समाजातील बांधिलकी व एकोप्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सत्कार स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!