जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच शिवसेना ॲक्शन मोडवर : तुळजापूर तालुक्यात चार गावांमध्ये शाखांचे भव्य उद्घाटन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच शिवसेना पुन्हा ॲक्शन मोडवर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्ताराला गती देत तालुक्यातील दीपकनगर तांडा, कुणसावळी, बोळेगाव आणि यमगरवाडी या चार गावांमध्ये एकाच दिवशी भव्य दिव्य सोहळ्यात शाखांचे उद्घाटन पार पडले.
हा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पक्षाचे सचिव संजय मोरे, उपनेते ज्ञानराज चौगुले, पालकमंत्री प्रताप सरनाईक व सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश जगताप, तसेच तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव , बापूसाहेब भोसल यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावकरी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या वेळी तुळजापूर शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख गणेश नेपते, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपाध्यक्ष रमेश चिवचिवे, भुजंग मुकेरकर, संभाजी नेपते, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, संजय लोंढे, नितीन मस्के, रितेश जवळेकर, गणेश पाटील, विकास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात संघटना विस्ताराचा शिवसेनेचा निर्धार स्पष्टपणे दिसून येत आहे. या मोहिमेमुळे पक्षाची संघटना सक्षम व प्रभावी होऊन आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.