तुळजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच गंगणे यांचा अनोखा उपक्रम;पाणीपत येथे पित्रपक्ष पंढरवड्यात शहीद वीरांना श्रद्धांजली
तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आगळावेगळा उपक्रम राबवला गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते विजय गंगणे यांनी आपल्या विजय गंगणे मित्र मंडळाच्या वतीने पाणीपत येथे पित्रपक्ष पंढरवड्याच्या निमित्ताने शहीद वीर योद्ध्यांना परंपरेनुसार विधी करून आदरांजली वाहिली.
पाणीपतच्या ऐतिहासिक रणांगणावर हजारो वीरांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले. मात्र या शहीदांच्या स्मृतीसाठी विधी करण्याची प्रथा कोणीच पुढे नेली नव्हती. विजय गंगणे यांनी या परंपरेला सामाजिक आणि राष्ट्रीय भावनेची जोड देत शहीदांना अर्पण केलेल्या या विधीमुळे तुळजापूरकरांच्या हृदयात अभिमानाची भावना दाटून आली आहे.
या उपक्रमावेळी गंगणे यांनी शहीद वीरांना तुपाचा दिवा लावून, पिंडदान व तर्पण अर्पण करत शहीदांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थना केली. यावेळी विजय सर गंगणे मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“स्वातंत्र्याची किंमत शहीदांच्या बलिदानामुळेच आपण ओळखतो. आजचा युवक या शौर्यगाथेचा वारसा जपत असेल तर त्याला खरी देशभक्ती म्हणता येईल. म्हणूनच या पित्रपक्षात शहीदांना स्मरण करणे हे माझे कर्तव्यच आहे,” असे विजय सर गंगणे यांनी तुळजापूरनामा न्युज शी बोलताना सांगितले.
“विजय गंगणे यांनी शहीदांची आठवण जागवून समाजात खरी राष्ट्रभक्ती रुजवली आहे. हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
“पाणीपतसारख्या ऐतिहासिक भूमीवर शहीदांना श्रद्धांजली देणे ही मोठी संवेदनशील जाणीव आहे. तुळजापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.”
“इतिहासाचा विसर न पडता शहीदांचा सन्मान करणे म्हणजे भावी पिढ्यांना देशप्रेमाची शिकवण देणे. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.”
पाणीपत येथे शहीद वीरांच्या स्मृतीस विधी करून श्रद्धांजली वाहताना विजय सर गंगणे मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.