भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुका अध्यक्ष आनंद दादा कंदले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष आनंद दादा कंदले यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने त्यांना रात्री पासून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले, धर्यशील दरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी दादांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
आनंद दादा कंदले यांनी तालुक्यातील संघटनात्मक बांधणीसोबतच कार्यकर्त्यांना प्रेरणा देत सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील अनेक तरुण कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह व उमेद निर्माण झाला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी “दादांचे नेतृत्व म्हणजे संघटनेला बळकटी” असे गौरवोद्गार काढले.