तुळजापूरात मंगळवारी समाजवादी पक्षाची बैठक
नूतन जिल्हाध्यक्ष लिंगय्या स्वामी महाराज यांचा जाहीर सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात देवराज मित्र मंडळ व समाजवादी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता भव्य बैठक आयोजित करण्यात आली आहे. तुळजापूर एसटी स्टँडजवळील जुन्या संपर्क कार्यालयात ही बैठक होणार असून, या प्रसंगी समाजवादी पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष लिंगय्या स्वामी महाराज यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
सत्कार सोहळा तालुक्याचे लोकनेते देवानंद रोचकरी व समाजवादी पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष कृष्णा रोचकरी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकीतील रणनीती तसेच मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
देवराज मित्र मंडळाचे पदाधिकारी, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते व तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.