दैनिक धाराशिव नामाच्या कार्यालयात “श्री” ची आरती-पूजन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते
धाराशिव : प्रतिनिधी
अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या दैनिक ‘धाराशिव नामा’ च्या मुख्य कार्यालयात विराजमान झालेल्या श्री गणरायाचा आरती-पूजनाचा सोहळा शनिवारी दि.६ सकाळी जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडला. जिल्हाधिकारी पुजार यांनी गणरायाच्या चरणी जिल्ह्यातील शांतता, समृद्धी आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मनोकामना व्यक्त केल्या.धाराशिव शहरातील प्रतिभा एक्झिटिव्ह येथील मुख्य कार्यालयात श्री गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा भक्तिभावाने करण्यात आली होती. गणेशोत्सव काळात विविध मान्यवरांनी आरती-पूजन केले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने या उत्सवाला विशेष अधोरेखित प्राप्त झाले. यावेळी मुख्य संपादक विनोद बाकले यांनी जिल्हाधिकारी पुजार यांचे शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करून स्वागत केले. याप्रसंगी आकाश घोगरे, सावन देवगिरे, कैलास लोकरे आदींसह ‘धाराशिव नामा’ परिवारातील सदस्य व गणेश भक्त उपस्थित होते. सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत व पारंपरिक जल्लोषात ‘धाराशिव नामा’ च्या श्री गणरायाचा विसर्जन सोहळा पार पडला.