पत्रमहर्षी, विचारवंत मार्गदर्शक, शब्दप्रभूत्व महेशजी पोतदार आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
पत्रकारितेतील “शब्दप्रभूत्व” महेशजी पोतदार !
समाज माध्यमातील पत्रकारिता क्षेत्रातील एक हिरा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार पोतदार नवोदितांचे मार्गदर्शक, निर्भीड आणि ज्यांची लेखणी नेहमीच आमच्यासारख्यांना दिपस्तंभ ठरते ते धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघांचे माजी जिल्हाध्यक्ष मा.श्री. महेशजी पोतदार यांचा आज वाढदिवस …
पत्रकारिता ही एक अशी प्रणाली आहे. की यात काम करणाऱ्या माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन व ज्ञानदान संपत नाही, खरेतर महेशजी यांच्या पत्रकारितेने धाराशिव जिल्हा अनेक वर्ष गाजला आणि गाजतो ही आहे, प्रचंड अभ्यास, शांत वृत्ती, नव्या विषयाचा अभ्यासुपणा, शिक्षण, शेती , सहकार, सामाजिक बांधिलकी, प्रशासन , राजकारण इतकेच नव्हे तर तुळजापूर -धाराशिव ऐतिहासिक संस्थांन पासून ते तुळजापूरच्या मातीतले काय गुणधर्म इथपर्यंत ते तुळजापूरच्या हजारो वर्षांचा इतिहास काय सांगतो ? याचं चालतं बोलतं विद्यापीठ त्यांच्यात ठासून भरलेले आहे.
तब्बल ३० वर्षाच्या धाराशिव जिल्हा पत्रकारितेच्या झंझावतात या माणसाने लेखणीला मोठी धार आणली. प्रशासनातील अधिकाऱ्यांवरचे आसूड असोत अथवा राजकारण्यांची केलेली चिरफाड असो, विविध विषयावरचे लेखन हे नेहमीच चर्चेचे विषय ठरले आहेत.
यापुढे जाऊन सांगायचे तर धाराशिव सारख्या भागात पत्रकारिता करणारे महेश जी पोद्दार नेहमीच निकोप आणि दर्जेदार लिखाण करीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे,
महेशजी पोतदार यांना वाढदिवसानिमित्त खुप सार्या शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य चांगले आरोग्य लाभो आणि त्यांचे सर्व संकल्प पूर्ण होओत याच मनस्वी सदिच्छा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा भोपी पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम परमेश्वर,तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक नवभारत नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बप्पा नन्नवरे आदि उपस्थित होते.