आपली पत्रकारिता सामान्य माणसासाठीच करणार – अनिल आगलावे
जिल्हा प्रतिनिधी पदी नियुक्ती झाल्याबद्दल तुळजापुरातील पत्रकाराच्या वतीने सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आजपर्यंत आपण ग्रामीण भागातील प्रश्नांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, आगामी काळात देखील सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आपली पत्रकारिता काम करेल असे आश्वासन तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आल्यानंतर दैनिक तरुण भारत नवनिर्वाचित जिल्हा प्रतिनिधी अनिल आगलावे यांनी दिले.
तुळजापूर येथील श्री पुजारी मंडळ कार्यालयात तरुण भारत सोलापूर या दैनिकाच्या जिल्हा प्रतिनिधी पदी अनिल आगलावे यांची नियुक्ती झाल्यानंतर स्थानिक पत्रकाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुण्यनगरीचे प्रतिनिधी श्रीकांत कदम, दैनिक नवभार – नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी, पत्रकार शुभम कदम, पत्रकार सोमनाथ पुजारी, पुढारीचे तालुका प्रतिनिधी डॉ.सतीश महामुनी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील मूळ रहिवासी असणारे पत्रकार अनिल आगलावे यांनी दैनिक एकमत जिल्हा कार्यालय धाराशिव येथे अनेक वर्ष संपादकीय विभागात काम केले आहे. त्यानंतर तरुण भारत सोलापूर या दैनिकाची तुळजापूर तालुका प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी काही काळ काम केले आहे. याशिवाय दैनिक सामना पुणे कार्यालय येथे उपसंपादक रिपोर्टिंग या पदावर मागील दोन वर्षापासून काम केले आहे. संपादकीय कामाचा चांगला अनुभव असल्यामुळे आगामी काळात सोलापूर तरुण भारत या दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनिल आगलावे काम करणार आहेत. सामान्य माणसाचे प्रश्न तसेच ग्रामीण भागातील महत्त्वाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने लिखाण, अनेक गुणवान आणि प्रतिभा असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन आरळी फेस्टिवल ही संकल्पना राबवली यामध्ये हिरकणी पुरस्कार त्यांनी सुरू केला आणि अनेक वर्ष दिला जातो आहे या शिवाय तुळजापूर शहरांमध्ये त्यांचे ज्या पुजारी नगर परिसरामध्ये वास्तव्य आहे तेथे असणाऱ्या पुजारी नगर फाउंडेशन या संस्थेच्या मार्फत देखील त्यांनी सामाजिक क्षेत्रात आणि सेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. केवळ पत्रकारिताच नव्हे तर आमदार संवाद मंच या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या एनजीओ संस्थेचे ते समन्वयक आहेत शिवाय विविध सामाजिक संस्थेची त्यांचा अत्यंत चांगला संबंध आहे
बसवंतवाडी येथे पाणीदार वसवंतवाडी ही संकल्पना राबविण्यासाठी त्यांनी आमदार संवाद मंच मार्फत एक सामाजिक चळवळ युद्धपातळीवर चालवली आणि तेथे चार हजार सीसीटी बंधारे बांधून या गावाचे पाण्याची पातळी दोन तासांनी वाढवली याशिवाय या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण देखील करण्यात आले आज त्या वृक्षाचे वय सर्वसाधारणपणे आठ वर्षापर्यंत झाले असून त्यांची संगोपनाची जबाबदारी देखील वन खाते आणि ग्रामपंचायत बसवंतवाडी यांच्या माध्यमातून करण्यात आली या सर्व कामाच्या पाठीमागे समन्वयक म्हणून अनिल आगलावे यांनी अत्यंत मोलाचे काम केले आहे. सामाजिक क्षेत्र आणि पत्रकारिता क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अनिल आगलावे यांचा तुळजापुरातील पत्रकारांच्या वतीने जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल हा सत्कार संपन्न झाला.