माता-पिता देवासमान आहेत, त्यांची सेवा हिच गणरायाची खरी सेवा -भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बोधले
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यातील बारूळ येथील बाळेश्वर गणेश तरुण मंडळाच्या वतीने बाप्पाची आरती धाराशिव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले यांच्या हस्ते करण्यात आली.
“गणपती बाप्पा केवळ मूर्तीत नसून जिथे माता-पितांची सेवा होते, तिथेच खऱ्या अर्थाने गणरायाचं वास्तव स्वरूप वास करते,” असा मौलिक संदेश भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले यांनी उपस्थित गणेश भक्तांना दिला.
यावेळी बाळेश्वर गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष दादा नारायण,उपाध्यक्ष स्वप्निल वट्टे,सचिव अभिजित वट्टे,आधर स्तंभ – वैजिनाथ ठोंबरे व सर्व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.