तुळजापूर नगरी ऊर्जादायी तीर्थक्षेत्र आहे – जयप्रकाश दगडे
तुळजापूर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे..
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यास मनाला प्रसन्न वाटते.कुटुंबाला नवचैतन्य प्राप्त होते,तुळजापूर नगरी ही खरोखरच ऊर्जादायी तीर्थक्षेत्र असल्याची भावना दैनिक नवराष्ट्र लातूर-बीड-धाराशिव आवृत्ती प्रमुख जयप्रकाश दगडे यांनी दर्शनानंतर व्यक्त केली.
पत्रमहर्षी, विचारवंत मार्गदर्शक, शब्दप्रभू, उत्तम व्यवस्थापक तथा नवभारत टाइम्स दैनिक नवराष्ट्र लातूर-बीड-धाराशिव आवृत्ती प्रमुख जयप्रकाश दगडे यांनी सहकुंटूब श्री तुळजाभवानी मातेची विधीवत पुजा करून मनोभावे दर्शन घेतले.
जयप्रकाश दगडे यांनी भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार श्रीमती माया माने यांनी तुळजाभवानीची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सहकुटुंबाचा सत्कार केला.
सत्कारानंतर बोलताना जयप्रकाश दगडे म्हणाले की, तुळजापूर हे तीर्थक्षेत्र जागतिक पटलावर यायचे असल्यास येथील मूलभूत सुविधावर अधिक काम होणे आवश्यक आहे, देविभक्तांना सहज सुलभ तुळजाभवानी मातेचे दर्शन मिळेल याची व्यवस्था करणे गरजेचे आहे, भाविकांची वाढती संख्या पाहता तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास महत्वाचा वाटतो अशी भावना व्यक्त केली.
यावेळी सार्वजनिक विभागाचे उपविभागीय अभियंता विजय आवळे, तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, पत्रकार अनिल आगलावे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.