तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करा – शिवसेना शेतकरी सेनेची मागणी

तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करा – शिवसेना शेतकरी सेनेची मागणी

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना निवेदन देण्यात आले असून,याची तहसीलदार,तुळजापूर यांच्यामार्फत पाठविण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील खरीप हंगामात उडीद, सोयाबीन, मूग तसेच इतर पिके उभे असतानाच मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले असून उपासमारिची वेळ शेतकरी वर्गावर येऊन ठेपली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पिकांचे पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व नुकसानभरपाईसाठी तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शिवसेना शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून तातडीने मदत जाहीर केली पाहिजे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर शेतकरी हालाखीच्या स्थितीत जाण्याची भीती आहे.

या निवेदनाची माहितीस्तव प्रत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख गणेश नेपते,तालुकाप्रमुख अमोल जाधव,तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,तुळजापूर शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे,संभाजी नेपते,लक्ष्मण नन्नवरे,बाळू भैय्ये,सुहास सांळुखे,संजय लोंढे,शहाजी हक्के,स्वप्निल सुरवसे,आप्पासाहेब पाटील,दिपक मोटे,कपील देवकते,लक्ष्मण माळी तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!