लाखो रुग्णांना जीवदान देणारा रक्तदानाचा महायज्ञ;विठाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केला आहे.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात गणेश उत्सवानिमित्त विठाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲड. आय.सी.यु.सेंटर च्या वतीने दिनांक ३ सप्टेंबर रोजी वेळ सकाळी १० ते ५ पर्यंत रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे. हे भव्य रक्तदान शिबिर सर्व श्रद्धावानांच्या उदंड प्रतिसादाने यशस्वी होणार आहे. शिबिरात सहभागी होऊन रक्तदानासारखे सर्वश्रेष्ठ दान नक्कीच यशस्वी करण्यासाठी विठाई हॉस्पिटलच्या वतीने आव्हाण करण्यात आले आहे.
रक्तदान केल्यानंतर शरीरात पुन्हा रक्तनिर्मितीची प्रक्रिया सुरु होते.
रक्तदानामुळे शरीरातील लोहाचं प्रमाण नियंत्रणात राहतं.शरीरातील लोहाचं प्रमाण वाढल्यास हृदय, यकृत, यासारख्या अवयवांना हानी पोहोचते.रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यास मदत होते.रक्तदान केल्यानं रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.