“पावणाऱ्या गणपती”आरती तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते करण्यात आली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ येथील”पावणारा गणपती”श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळाच्या गणेशोत्सव दि.२ सप्टेंबर रोजी आरतीचा मान नवराष्ट्र टाईम्स नवराष्ट्र समुहाचे तालुका प्रतिनिधी तथा तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांनी मंगलमय वातावरणात आरती केली.
“गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण असून तो कायदा-सुव्यवस्था राखत शांततेत साजरा करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे मत पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
शहरातील नागरिकांना, गणेशोत्सव मंडळांना पावणाऱ्या गणती बप्पांची आरती उत्सवाच्या यावेळी शुभेच्छा देताना डॉल्बीमुक्त आणि पारंपरिक वाद्य सोबत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांनी केले.
यावेळी वडार समाजाचे नेते आण्णप्पा पवार विशेष कार्यकारी दंडाधिकारी व भावी नगरसेवक,सोमनाथ हणुमंत पवार,वडार समाजाचे अध्यक्ष पाराजी देवकर माजी नगरसेवक ,सुनिल पवार,अनिल पवार,युवा नेते यल्लाप्पा मंडवळे ,ज्येष्ठ नेते श्रावण पवार,
गोकुळ माने, राजू देवकर या सर्व मान्यवरांनी बाप्पांच्या आरतीमध्ये सहभागी झालेल्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष गणेश साळंके यांनी गणरायाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मंडळाचे जेष्ठ सभासद व मंडळाचे आधारस्तंभ सज्जनराव साळुंके उपस्थित आदि होते.
पावनारा गणपती मंडळ केवळ गणेशोत्सवाच्या मर्यादेत न राहता या वर्षीच्या कार्यक्रमात स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,हवी असेल सुद्धा हवा आजच झाडे लावा”झाडे लावा झाडे जगवा” हरित धाराशिव,आरोग्य शिबिर, बेटी बचाव बेटी पढाव,”मा नही तो बेटी नही बेटी नही तो बेटा नही”.सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे केंद्रबिंदू ठरला आहे. आज तुळजापूर परिसरात पावणाऱ्या गणपती मंडळाच्या कार्याचे कौतुक होत आहे.