लोकमंगल मल्टीस्टेट,तुळजापूर कार्यालयात बाप्पांच्या आरतीचा मान पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गवळी यांना
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
लोकमंगल मल्टीस्टेट शाखा तुळजापूर येथील कार्यालयातील गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साही, मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाचे विराजमान झालेल्या पप्पांची आरती तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा नवभारत टाइम्स दै.नवराट्र तुळजापूर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते दि.१ सप्टेंबर रोजी महाआरती करण्यात आली.
यावेळी लोकमंगल मल्टीस्टेट चे शाखा अधिकारी अनिल सिद्धकी, पदाधिकारी विनोद देवकर,प्रशांत पवार,खंडेराव देवकर,शंकर क्षीरसागर,विकास गुरव,उद्योजक आशुतोष लबडे बाप्पाच्या महाआरतीस सहभागी होते.माजी मंत्री सुभाष देशमुख व व्यवस्थापक रोहन देशमुख यांनी यांच्या तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट कार्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.पदाधिकाऱ्यांनी आरती करून मनोभावाने दर्शन घेतले.
धाराशिव जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना, नागरिकांना, गणेशोत्सव मंडळांना श्री गणेश उत्सवाच्या यावेळी शुभेच्छा देताना डॉल्बीमुक्त आणि पारंपरिक वाद्य सोबत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन लोकमंगल मल्टीस्टेट चे अध्यक्ष रोहन देशमुख व संचालक सचिन आडगळे यांनी केले.