तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून पोलिस यंत्रणेचा आरोप असलेला आरोपी “S” यास विशेष जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव यांच्याकडून रेगुलर जामीन मंजूर

तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून पोलिस यंत्रणेचा आरोप असलेला आरोपी “S” यास विशेष जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव यांच्याकडून रेगुलर जामीन मंजूर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्र भर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून पोलिस यंत्रणेचा आरोप असलेला आरोपी नाव (संरक्षित करण्यात आलेले नवा) (Identity of Accused is protected) addressed as “S” यास विशेष जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव यांच्याकडून रेगुलर जामीन मंजूर करण्यात आला. सदर प्रकरणा पोलीस अधिकारी व यंत्रणेचा तपासातील आरोपानुसार सदरील आरोपीने मुख्य आरोपी यांना ड्रग्स पेडलर यांचा मोबाईल क्रमांक दिले बाबत व तसेच सरकार पक्षाच्या माण्यानुसार सदर आरोपीने मुख्य आरोपी नामे संगीता गोळे, खोत तसेच इतर मुख्य आरोपींची मोबाईल द्वारे कम्युनिकेशन करून व तसेच त्यांच्याकडून सदरील एमडी ड्रग्स खरेदी केले व ते तुळजापूर गावामध्ये व इतर भागांमध्ये मागील तीन ते चार वर्षापासून विक्री करत असलेल्या बाबत तपासात दर्शवलेली होते. वास्तविक पाहता सदरील आरोपी “S” यास अटक झाल्यानंतर माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश मिटकरी मॅडम यांच्या कोर्टात रेग्युलर जामीन अर्ज ॲड विशाल प्रभाकर साखरे यांच्यामार्फत दाखल केलेला होता. सदर जामीन अर्जाच्या अनुषंगाने ॲड. विशाल साखरे यांनी जामीन ठेवत असताना जामीन अर्जामध्ये विविध मुद्द्यावरती सदरचा अर्ज ठेवला होता सदरील मुद्दे खालील प्रमाणे.

जामीन अर्जातील मुद्दे;सदरील आरोपी “S” हा सदर प्रकरणात मुख्य सूत्रधार नसलेबाबत 

ड्रग्ज प्रकरणात सदरील आरोपी हा मुख्य सूत्रधार नसून केवळ मोबाईल क्रमांक देऊन मुख्य आरोपींना मदत केले बाबत आरोप संदर्भात ॲड साखरे यांनी समर्पकासायुक्तिवाद सादर केला. वास्तविक सदरील आरोपी हा माझी नगराध्यक्ष यांच्याकडे त्यांचे अकाउंटन्सी चे काम करण्यास व तसेच त्यांचे इतर व्यवसायातील आर्थिक गोष्टीची पाहणी करण्यासाठी त्याची नियुक्ती होती. त्या अनुषंगाने त्यांनी कोणतेही प्रकारची वैयक्तिक स्वतःचे आर्थिक व्यवहार सदरील एमडी ड्रग्स प्रकरणात करण्यात आलेले नव्हते. तसेच केवळ सदरील आरोपीचा मुख्य सूत्रधार या नावाखाली त्याच्यावर ठेवण्यात आलेला ठपका हा चुकीचा असल्याचे युक्तिवादात सांगितले. त्याचप्रमाणे केवळ एकच आर्थिक स्वरूपाचे रुपये २५००० चे ट्रांजेक्शन हे देखील सदरील त्यांचे मालकांनी सांगितल्याप्रमाणे पुढे प्रस्तावित पाठवले असले बाबत युक्तीवादात सांगितले तसेच सदरील आर्थिक ट्रांजेक्शन बाबत सदरील आरोपीचा कोणताही संबंध नसल्याचा सद्सद् विवेक बुद्धीचा युक्तिवाद ॲड साखरे यांनी माननीय न्यायालय मांडला.

मुद्दा दोन

सदरील आरोपी यास गंभीर स्वरूपाचा आजार असल्याने त्याबाबत सदर आरोपीस त्याच्या उपचाराकरिता तात्काळ जामीन देणेबाबत केलेला युक्तिवाद.
आरोपीस दुर्धर व गंभीर स्वरूपाचा आजार असल्याने प्रकरण दाखल करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदरील कोणत्याही आरोपीस जर दुर्धर असा आजार असेल त्या व्यक्तीची ओळख संरक्षित करून तो ( protect identity of accused) सदरची न्यायालयीन प्रक्रिया म्हणजेच त्याचा जामीन अर्ज सादर करत असताना देखील सदर आरोपीचे नाव लिखित स्वरूपात प्रसिद्ध करता येत नाही या सर्व मार्गदर्शक तत्वाचे पालन करून ॲड, साखरे यांनी सदर आरोपीचा जामीन अर्ज हा “S” या नावाने सादर करण्यात आलेला होता. प्रकरणात सदरील आरोपीला गंभीर आजारामुळे त्याला विविध प्रकारचे अनेक आजार जडत असून तुरुंगामध्ये ठेवून त्याचा इलाज व उपचार करणे कठीण आहे. तसेच त्याला झालेल्या अतिरिक्त आजारपणा संदर्भात त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळण्याच्या अनुषंगाने ॲड विशाल साखरे यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे विविध न्याय निवाडे सादर केले ज्यामध्ये दुर्दशा गंभीर आजार असणाऱ्या आरोपीबाबत काही महत्त्वाचे न्याय निर्णय यामध्ये आरोपी जामीन मंजूर करून त्याला वैद्यकीय ट्रीटमेंट योग्य रीतीने मिळण्यासाठी विचार करण्यात आलेला होता. ती सर्व मार्गदर्शक सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे न्याय निर्णय सादर करून सदर आरोपी वैद्यकीय ट्रीटमेंट मिळण्यासाठी देखील एक महत्त्वाचा मुद्दा ॲड साखरे यांनी माननीय न्यायालयापुढे उपस्थित केला.

आरोपी हा पोलीस यंत्रणेला तपासा दरम्यान मदत करण्यास तयार असल्याचा मुद्दा युक्तिवादाच्या दरम्यान ॲड. साखरे यांनी मान्य न्यायालयाला सदरील आरोपी हा माननीय न्यायालयाच्या सर्व घालून दिलेल्या अटीचे पालन करून पोलीस तपासात सहकारी करणार असले बाबत सांगितले.

अर्जदार आरोपीचे पूर्वीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसले बाबतचा मुद्दा दोन युक्तिवादामध्ये ॲड. विशाल साखरे यांनी सदरील आरोपी याच्यावरती यापूर्वी ड्रग्स प्रकरणासंदर्भात कोणताही पूर्वीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसले बाबतचा युक्तिवाद सादर करण्यात आला.

सदर प्रकरणातील दाखल करण्यात आलेले दोषारोप पत्र हे दहाहजार पानाचे असून आरोपीस तुरुंगात ठेऊन केस चालवता येणार नाही असे मुद्दे मांडण्यात आले तसेच या प्रकरणात आणखीन एक आरोपी जगदीश पाटील यांचा रेगुलर जामीन अर्जावर उद्या सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. त्या कडे सर्व लक्ष लागून आहे.

सदरील सर्व नमूद केलेले मुद्दे व  ॲड साखरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश  मिटकरी मॅडम यांनी सदरील आरोपीस रेग्युलर जामीन अटी व शर्तीवर मंजूर केला. सदर प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड मंजुषा साखरे,ॲड. महेश लोहार,ॲड. शुभम तांबे,ॲड. अमित गोळे,ॲड. अर्चना कांबळे,ॲड.आकाश एडके,ॲड. उदय आडेकर,ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड. संकेत गोरे,ॲड .ओंकार कोरेगावकर, महेश पवार, रोहित लोमटे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!