तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपी कुऱ्हाडेचा जामीन मंजूर – ॲड अमोल वरूडकर

तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपी कुऱ्हाडेचा जामीन मंजूर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्र राज्यभरात गाजत ड्रग्ज प्रकरण असलेले तसेच राजकीय आखाडा ठरलेले तुळजापूर एम डी ड्रग्स प्रकरण सातत्याने चर्चेत आहे.तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी कुऱ्हाडे याची बाजू ॲड अमोल वरुडकर यांनी अत्यंत प्रभावीपणे व मुद्देसूद मांडली. त्यामुळे धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश मिटकरी यांनी आरोपी कऱ्हाडे याचा नियमित जामीन मंजूर केला आहे.

तुळजापूर येथील एम.डी. ड्रग्स प्रकरणातील आरोपी नानासाहेब कुऱ्हाडे यांच्या विरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२/२०२५ विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.आरोपीस जामीन मिळावा यासाठी न्यायालयात ॲड. अमोल वरुडकर यांनी जामीन अर्ज दाखल केला  होता. ॲड. वरुडकर यांनी मुद्देसूद प्रभावी युक्तिवाद करीत आर्थिक व्यवहाराची सत्यता न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे न्यायाधीशांनी ॲड. वरुडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कुऱ्हाडे याचा नियमित जामीन मंजूर केला आहे.

error: Content is protected !!