“कृष्णरूपसज्जा” कार्यक्रमात शिवन्या क्षीरसागर व कृष्णराज गंज पाटील प्रथम
विद्याधाम इंग्लिश स्कूलमध्ये संस्कार भारतीचा कृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम संपन्न
तुळजापूर : प्रतिनिधी
विद्याधाम इंग्लिश स्कूल आणि संस्कार भारती तुळजापूर संयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्ण रूप सज्जा कार्यक्रमांमध्ये मोठ्या गटामधून शिवण्या क्षीरसागर व लहान गटामधून कृष्णराज गंजे पाटील यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न झालेल्या श्रीकृष्णाच्या वेशभूषा स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे लहान गट प्रथम क्रमांक कृष्णराज गंजे पाटील द्वितीय क्रमांक अनुष्का कांबळे तृतीय क्रमांक राजवीर दाणे मोठा गट प्रथम क्रमांक शिवण्या क्षीरसागर, द्वितीय क्रमांक काव्या जाधव, तृतीय क्रमांक समर्थ टेकाळे यांनी पारितोषक प्राप्त केले. विजेत्यांना प्रदेश सह महामंत्री डॉ सतीश महामुनी, प्रदेश दृश्य कला सह संयोजक पद्माकर मोकाशे, मुख्याध्यापक सौ. प्रबोधिनी भूमकर, गायिका सौ. जगदेवी हनुमंते, जिल्हा लोककला संयोजक रतन मस्के यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी यावेळी सौ.अमृता नाईक, साक्षी गायकवाड, श्वेता नाईकवाडी, कांचन गंजे पाटील, दिपाली शामराज, छाया जगताप, शुभांगी जाधव , रेश्मा चव्हाण, प्रतीक्षा कांबळे, वर्षाराणी चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता नाईक यांनी केले. मान्यवरांचे स्वागत दिपाली शामराव,रेश्मा चव्हाण, साक्षी गायकवाड यांनी केले. रतन मस्के यांनी आभार मानले..