अध्यक्षपदी सुरेश चौधरी तर सचिवपदी निखिल डाके यांची निवड
तुळजापूर – येथे संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून उत्सव समिती अध्यक्षपदी सुरेश चौधरी तर सचिवपदी निखिल डाके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
उत्सव समितीत उपाध्यक्ष पदी प्रितेश डाके, कोषाध्यक्षपदी जयंत चौधरी, कार्याध्यक्षपदी आण्णासाहेब वाघमारे तर महाप्रसाद समिती प्रमुख म्हणून बाळासाहेब राऊत यांची निवड करण्यात आली आहे.श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा मंगळवारी सायंकाळी महंतांच्या उपस्थितीत केली जाणार आहे तर बुधवारी गुलाल किर्तन सेवा संपन्न होणार असून यावेळी नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे.श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा कुंभार गल्ली कार पार्किंग शेजारी नियोजित जागेवर
बुधवारी 20 ऑगस्ट संपन्न होत असून नाभिक समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.