श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत राधाकृष्ण मंदिराच्या स्लॅबचे पुजन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूरमधील प्रतीक्षा नगर येथील श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत राधाकृष्ण मंदिराचा स्लॅब भरण्याचे काम सुरू केले आहे. स्लॅब भरण्यासाठी आवश्यक तयारी आणि साहित्य उपलब्ध करून मंदिराचे बांधकाम वेगाने चालू केले आहे.स्लॅब भरण्यासाठी आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ कामाला लागले आहे.बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कृष्णा गणेश मंडळाचे सदस्य व पदाधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.यावेळी राधाकृष्ण मंदिराचास्लॅबचे भुमीपूजन कृष्णा गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवरत्न मोटे,गणेश बागल,बिबीशन लाटे,तुकाराम मोटे,राजू भोसले,गजानन कांबळे, इत्यादी उपस्थिती होते.