मंदिराचे शिखर पाडण्याचा नावाखाली अर्धवट व्हिडिओ क्लिप दाखवत;”खासदार व आमदार पाटलांच्या “पोटात पोट सुळ उठला आहे” – नितिन काळे.

मंदिराचे शिखर पाडण्याचा
नावाखाली अर्धवट व्हिडिओ क्लिप दाखवत;”खासदार व आमदार पाटलांच्या “पोटात पोट सुळ उठला आहे” – नितिन काळे.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

श्री तुळजाभवानी मातेच्या आराखडा मंदिराचा विकास करण्याबाबत भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मीडियासमोर जे बोलले त्याचा अर्धवट व्हिडिओ खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दाखविला आहे. तो पूर्ण दाखविणे अपेक्षित होते मात्र अर्धवट व्हिडिओ दाखविणे हेच षडयंत्र असल्याचा पलटवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे तुळजापूर तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी संयुक्तपणे रविवारी दि. १७ ऑगस्ट रोजी धाराशिव येथील भाजप भवन भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.श्री तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या नावाखाली मंदिराचे शिखर पाडण्याचा घाट घातला जात असल्याच्या आरोपांमुळे धाराशिव जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. एका अर्धवट व्हिडिओ क्लिप दाखवून भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना टार्गेट करणे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचे षडयंत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा एक जुना अर्धवट व्हिडिओ सार्वजनिक करीत जनतेची दिशाभूल केलीजात आहे.

भाजपकडून प्रतिष्ठा भवन येथे पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा…

भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी पत्रकार परिषदेमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवून केला खुलासा. “ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी दाखवलेला व्हिडिओ अर्धवट आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल,” असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे म्हणणे असल्याचे पूर्ण व्हिडिओ क्लिप दाखवून स्पष्ट केले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अहवाला नंतरच अंतिम निर्णय होणार आहे.

पुर्ण व्हिडीओ पहा…

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!