गोकुळाष्टमीदिनी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा
तुळजापूर – पुजारी नगर सोसायटीमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव महिला भगिनींनी भजनसंध्या,श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गाऊन भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
सौ. शुभांगी गणेश पुजारी यांच्या संकल्पनेतून प्रथमच श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते, रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म उत्सव पाळणा गात एकमेकींना सुठवडा आणि मिष्ठान्न देत साजरा केला.
याप्रसंगी सुनंदा पुजारी,कल्पना शिंदे,मंगल गवळी, रूपा अग्रवाल, जगदेवी पवार,दिपाली ढवळे,प्रिया कोळेकर,आशा पुजारी,रूपाली जाधव,सानिका पुजारी, नीता पुजारी, लक्ष्मी जाधव,वासंती गायकवाड, दिपाली पुजारी,अश्विनी देशमुख,रेश्मा कवडे, श्रीमती मोकासे, सरोजीनी देवकते आदी महिलांनी परिश्रम घेतले.