शिवसेनेकडून पुन्हा भाजप–काँग्रेसला खिंडार, तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर प्रवेश
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धती व विचारांनी प्रेरित होत तुळजापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप व काँग्रेसला धक्का देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.
हा पक्षप्रवेश कार्यक्रम पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना पक्षाचे उपनेते ज्ञानराज चौगुले, संपर्कप्रमुख भगवान देवकते, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे व तुळजापूर तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. या सर्व मान्यवरांच्या हस्ते नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना भगवा झेंडा प्रदान करण्यात आला.
शिवसेनेत दाखल झालेले सदस्य:
नळदुर्ग – शारदाताई घोडके, ज्योतीताई पवारचिकुंद्रा – दिपक शिवाजी मोटे, सुधाकर यशवंत गायकवाड, केशव बलभीम बागल, नितीन राजेंद्र गायकवाड, चंद्रकांत महेश गायकवाडवाणेगाव – सुरेश बचाटे, बसवंत देवकतेकाटगाव – सूर्यकांत जोकार
यापूर्वीही तालुक्यातील भाजप व काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांचा पक्षप्रवेश घडवून आणल्यानंतर, शिवसेनेने पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांना धक्का दिला आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेची ताकद वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांनी सांगितले, “ही तर फक्त सुरुवात आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच तुळजापूर शहरातील माजी नगरसेवक यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते भव्य जाहीर प्रवेश होणार आहे.”या कार्यक्रमास मीनाताई सोमाजी,राधा घोगरे,रेणूका शिंदे,शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेपते, तुळजापूर शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे, युवा नेते शहाजी हाक्के, भुजंग मुकेरकर, रितेश जावळेकर, नितीन मस्के, स्वप्निल सुरवसे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.आगामी काळात तालुक्यातील इतर कोणते नेते आणि सदस्य शिवसेनेत दाखल होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.