प्रियंका गंगणे यांच्यावतीने तुळजापूर शहरातील महिलांना देवदर्शन.
तुळजापूर : प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर तुळजापूर शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रियंका विजय गंगणे यांनी शहरातील विविध भागातील सत्तर महिलांना मोफत देवदर्शन घडवले आहे. टेम्पो ट्रॅव्हलर या चार वाहनातून अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर आदी देवस्थानाचे दर्शन महिलांना घडवण्यात आले .
त्यानंतर सोलापूर येथे भगवान विष्णूंच्या जीवनपटावर आधारित असलेल्या नरसिम्ह सिनेमा या महिलांना दाखवण्यात आला. यावेळी महिलांची गैरसोय न होण्याची काळजी प्रियंका गंगणे यांच्याकडून घेण्यात येत होती तुळजापूर शहरात गंगणे कुटुंबियांकडून वेळोवेळी सामाजिक कार्य करण्यात येत असते यामध्ये दिवाळी सणानिमित्त गरीब कुटुंबीयांना किराणा साहित्याचे वाटप तसेच रमजान ईद मध्ये मुस्लिम बांधवांना साहित्याचे वाटप आधी करण्यात येते. नुकत्याच नागपंचमी सनानिमित्त तीन दिवसाचा मोठा महोत्सव प्रियंका विजय गंगणे यांच्याकडून महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता याला शहरातील महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.