ग्रामपंचायत गोंधळवाडीच्या सरपंपदी महिला सौ.सविता उमेश मोटे यांची निवड
घराला घरपण देणारी महिला आज गावाला विकासात्मक व ध्येयाने काम करत लौकिक मिळवून देत असल्याचा अभिमान – अँड रामचंद्र ढवळे
तुळजापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. महिला सरपंच हे फक्त नामधारी पद नसून गावाची सेवा करण्याची संधी आहे.तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच रूक्मीनबाई विश्वनाथ मोटे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीनामा मंजूर झाला व काही दिवसांनी त्यांचे निधन झाले, यामध्ये गोंधळवाडी ग्रामपंचायत सरपंच पद रिक्त पद होती, यानंतर गोंधळवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड दि.१३ ऑगस्ट रोजी करण्यात आली यावेळी अँड, ढवळे, विकास हावळे,शहाजी देवगुंडे फरीद शेख,पोपट मोठे,गोपाळ मोटे,उमेश मोटे, नारायण जानराव यांनी महिला सरपंचा सन्मान सत्कार केला.
बाई झाली सरपंच, सुधारला गावाचा प्रपंचमहिला सरपंचांचा सन्मान केल्याने इतर महिलांनाही प्रेरणा मिळते आणि त्यांना सार्वजनिक जीवनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळते महिला सरपंचांच्या कार्यामुळे गावात सकारात्मक बदल घडवता येतात, ज्यामुळे गावाचा विकास साधता येतो.
अँड, रामचंद्र ढवळे तुळजापूर