उपविभागीय अभियंता व्हि.वाय.आवाळे यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दुसरा क्रमांक
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशस्तीपत्र देउन यांचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थ क्षेत्र तुळजापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत महाराष्ट्र शासनाने “१००” दिवसाचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत कार्यालयाची सुधारणा करणे तालुक्यातील सर्व कामाची माहिती उपलब्ध करून देणे नागरिकांचे जीवन सुकर होरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध कामे त्वरित करून देणे तसेच कामांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्याकरिता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जागृती करणे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया यंत्र तयार करून खराब पाण्याचा वापर योग्य पाण्यात रूपांतर करणे या बाबींचे सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर येथील उपविभागीय अभियंता व्हि.वाय.आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली याबाबत परीक्षित स्तरावर स्पर्धा घेऊन तुळजापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा सर्वोत्कोष्ट कामगिरी केल्याबद्दल दुसरा क्रमांक मिळाला होता.दि.१५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर येथील उपविभागीय अभियंता व्हि.वाय.आवाळे यांना प्रशस्तीपत्र देउन यांचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,मा.पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व स्टाफ आदी उपस्थित होता.