लाडक्या बहिणी तुपाशी, लाडके भाऊ उपाशी:,अण्णासाहेब जावळे पाटील अर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकरत सुरू करा – राजाभाऊ साळुंके
धाराशिव : मराठवाडा अण्णासाहेब जावळे पाटील अर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकरत सुरू करा धाराशिव छावा संघटना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी दि.१५ ऑगस्ट रोजी परिवहन राज्यमंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना स्वातंत्र्य दिनाचा झेंडा वंदन कार्यक्रम झाल्यावर निवेदन देण्यात आले.
मराठवाड्याचा मागासलेपण दूर करण्यासाठी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने मराठवाडा अर्थिक विकास महामंडळ अभ्यासगट युती शासन २०२५ महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले आहे. ते कार्यान्वित करून त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा व त्या महामंडळावर ५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा जेणे करून मराठवाडा जो की भारत स्वातंत्र्य होऊन झाला तरीही मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता,१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा बिनशर्थ भारतात विलीन करण्यात आला परंतु मराठवाडाच्या विकासासाठी आजपर्यंत कोणत्याही होऊन गेलेल्या महाराष्ट्र शासनाने कुठलेही मोठे अर्थिक नियोजन विकासा संदर्भात केलेले नाही त्या मुळे मराठवाडा मागास झाला. परंतु हे महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित केले तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अर्थिक मदत होईल. त्या अनुषंगाने शेतकरी शेतीसाठी जोडधंदे करून शेतकऱ्यांनचा विकास होईल त्याच बरोबर मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठीचा प्रयत्न पूर्ण होईल याच उद्देशाने राजाभाऊ साळुंके छावा संघटना जिल्हा अध्यक्ष,धाराशिव यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्याकडे मागणी केली आहे.