उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सत्कार.

उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सत्कार.

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगीरी करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. निलेश देशमुख, उपविभाग तुळजापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुने, पोलीस ठाणे नळदुर्ग यांनी फिर्यादीचा ट्रक क्र केए 56-4380 अंदाजे 10 लाख किंमतीचा ज्यामध्ये 2,31,42,871 ₹ किंमतीचे 24 टन्‍ 770 किलो कॉपरचे रॉड, तीन मोबाईल फोन माल बळजबरीने घेवून गेलेले आरोपीचा शोध घेवून गुन्ह्यांत सर्वच गेला माल 2,31,42,871₹ हस्तगत केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, उपविभाग उमरगा- यांनी आरोपी संतोष शहाजी शहापुरे रा. तुरोरी ता. उमरगा याने त्याचे कब्जात विनापस परवाना बेकायदेशीर रित्या गावठी पिस्टल 06 कोयते व चाकु कार क्र एमएच 25 बी.ए. 6279 असे एकुण 2,53,500₹ मुद्देमाल मिळून आला. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे स्थानिक गुन्हे शाखा, शंकर सुर्वे, पोलीस ठाणे परंडा- यांनी परंडा पोलीस ठाणे गुरनं-188/2025 कलम 309 (6), 3(5) अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करुन माल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला. पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर पोलीस ठाणे आनंदनगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलीस ठाणे तुळजापूर- यांनी फिर्यादी व त्यांचे मित्र प्रविण इंगळे असे व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडने त्यांची कार क्र एमएच 12 QT 7790 मारुती सुझुकी एस क्रास नेक्सा मध्ये बसून जात असताना दोन नेमप्लेट झाकलेल्या मोटारसायकल वरील तोंड झाकलेल्या चार अज्ञज्ञत व्यक्तीने मिळून फिर्यादीचे गाडीवर दोन्ही बाजूने अंडे, दगड मारुन काच फोडुन गाडीमध्ये फिर्यादीचे व त्यांचे मित्राचे अंगावरती पेट्रोल भरलेले पॉकेट फेून हल्ला केला. वगैरे फिर्याद वरुन सदरचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात आरोपीतांना अटक करुन गुन्हा उघडकिस आणला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कराळे, कनष्ठि तंज्ञ, अंगुली मुद्रा- यांनी गुन्ह्यातील घटनास्थळावरुन चान्सप्रिंटनचा शोध घेवून अँम्बीस प्रणालीवरुन सन 2025 मध्ये 13 गुन्हे व एक अनोळखी मयत उघडकीस आणले. फिंगरप्रिन्ट चे प्रमाण 98 टक्के केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चास्कर,पोलीस ठाणे पोलीस हावलदार- रवि भागवत, पोलीस ठाणे तुळजापूर यांनी शारदीय नवरोत्र उत्सव 2024चे उत्कृष्ट नियोजन केले.पोलीस हावलदार- दिपक लाव्हरे पाटील, भरोसा सेल धाराशिव यांनी – वाशी येथील एक अल्पवयीन मुलगा व मुलगी घरातुन निघून गेले होते. त्यांचा शोध घेवून त्यांना त्यांचे आई वडीलांचे ताब्यात दिले होते. या अधिकारी अमंलदार यांचा आज दि.15 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मा.पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देउन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी- अंमलदार, प्रतिष्ठीत नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी- अमंलदार उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!