तीन शासशाकीय कार्यालयात ध्वजारोहण न करणाऱ्या कार्यालयांना प्रशासन काय कारवाई करणार ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होत असून,देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत लाखो लोकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला आहे. मात्र असे असतांना तुळजापूर शहरातील काही शासकीय कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कार्यालयांना शासन काय कारवाई करणार ? दि.१५ ऑगस्ट रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, तहसील कार्यालय, तुळजापूर यांना
भ्रष्टाचार निर्मुलन समिती व मा.सदस्य दक्षता समिती शासन) महाराष्ट्र ) धनाजी भिमराव कुरूंद यांनी निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले आहे की सदर कार्यालयात ध्वजवंदन कार्यक्रम झालाच नाही.
निवेदनात असे नमूद केले आहे की,१५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण शासकीय कार्यालयाच्या प्रांगणामध्ये करणे नियमानुसार आवश्यक होते. मात्र तुळजापूर शहरातील तालुका क्रीडा संकुल, एकात्मिक बालविकास सेवा योजना, ग्रामीण प्रकल्प तसेच पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालय, तुळजापूर या तिन्ही ठिकाणी आज ध्वजारोहण झालेले नाही.
या तिन्ही कार्यालयास स्वतंत्र जागा आहेत. कांही ठिकाणी ध्वजारोहणासाठी ध्वजस्तंभ देखील आहेत. परंतु ते आज ध्वजाविना रिकामे कार्यालये दिसत आहेत एकंदर सदर कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे ध्वजारोहण करण्यासाठी वेळ नाही की अजुन काय कारण आहे ते चौकशी करून जबर कारवाई केल्यावरच लक्षात येईल प्रत्यक्षात सदर प्रकरणात तिन्ही शासकीय कार्यालयीन अधीक्षकांवर देशद्रोहाचा व भारतीय तिरंग्याचा अपमान केल्याचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वादे तहसीलदार तुळजापूर यांना केली आहे व
माहितीस्तव ,जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांना हि देण्यात आले आहे.या निवेदनावर शासकीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे धनाजी भिमराव कुरूंद यांची स्वाक्षरी आहे.