१८ ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव : प्रतिनिधी
महिलांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महिला लोकशाही दिनात,समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी सादर करण्याची संधी मिळेल.तक्रारी वैयक्तिक स्वरुपाच्या असाव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे,सेवा/आस्थापना विषयक मुद्दे व अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.गरजु महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांनी केले आहे.