वैभव चोपदार यांनी स्वतः आश्रम शाळेत केक कापून मुलांबरोबर हसत-खेळत वाढदिवस साजरा करीत आनंद व्यक्त केले.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील वैद्यकिय मेडीकल क्षेत्रातील एम आर वैभव रामभाऊ चोपदार यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत, समाजकार्यासाठी केला खर्च केला…खऱ्या अर्थाने, हा वाढदिवस केवळ वैभव चोपदार यांचा नव्हता, तर तो त्या सर्व मुलांचा आनंदोत्सव ठरला.
मानवतेचे खरे सौंदर्य हे केवळ दिखाव्यातून नव्हेतर कृतीतून दिसून येते, याचा प्रत्यय युवा नेत्तृत्व मेडीकल क्षेत्रातील वैभव रामभाऊ चोपदार यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद अनाथ व वंचित घटकातील मुलांसोबत साजरा केला.वैभव रामभाऊ चोपदार यांनी वाढदिवसाच्यानिमित्ताने तुळजापूर शहरातील जय तुळजाभवानी माता! केंद्रीय प्राथमिक आश्रम शाळेत, वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबांतील लहान मुलांना खाऊ, गरजू साहित्य वाटप करण्यात आले.आश्रमात जाऊन मुलांसोबत वेळ घालवला. त्यांच्या उपस्थितीने मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. काहींच्या डोळ्यांत चमक होती तर काहींना आनंदाश्रूही अनावर झाले.या दिवशी मुलांसाठी फळे, खाऊ इतर काही गरजू वस्तू वाटप केला संपूर्ण आश्रमात आनंदाचा सुगंध दरवळत होता. वैभव चोपदार यांनी स्वतः केक कापून मुलांबरोबर हसत-खेळत आनंद व्यक्त केले. यावेळी दिनेश पलंगे , चिंतामणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ चोपदार ,बालाजी सर,दुर्गेश वराडे शळेतील सर्व शिक्षकस्टॉप आदि मान्यवर उपस्थित होते.
“आधुनिक समाजाला दिलेला एक मौल्यवान संदेश”असल्याचे वैभव रामभाऊ चोपदार यांनी बोलताना मत व्यक्त केले.