कै.दत्तात्रय गुंड यांच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपये तातडीने मदत करणार – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
दि.१४ ऑगस्ट कै. दत्तात्रय गुंड यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडून दिले जाणार नाही. त्यांना मानसिक आधाराबरोबरच आर्थिक मदत देऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासन आणि व्यक्तीश: मी त्यांच्या पाठीशी आहोत.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते आज कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील कै. दत्तात्रय गुंड यांच्या पिडीत कुटुंबियांच्या सांत्वन प्रसंगी बोलत होते.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले,२६ जुलै रोजी खामसवाडी येथील कै.दत्तात्रय मनोहर गुंड यांचे वीजेची तार पडून अपघाती मृत्यू झाला. राहत्या घराचे नुकसान झाले.त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. कुटुंबाला मानसिक आधारा बरोबरच आर्थिक मदतीची देखील गरज होती. त्यामुळे आज या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी गुंड कुटुंबीयांची भेट घेतली,त्यांचे सांत्वन केले.तातडीने सुमारे ११ लाख रुपये मदत देण्याची ग्वाही दिली
त्यानुसार संबंधित कुटुंबाला महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाकडून ४ लाख रुपये ,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत २ लाख रुपये तसेच माझ्याकडून व्यक्तीच्या ५ लाख रुपये ची अशी सुमारे ११ लाख रुपये मदत आम्ही देत आहोत.ज्यामध्ये संबंधित कुटुंबाचे चांगले घर बांधून होईल व त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पीडित बहिणीला अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
पिडीत भगिनींचे कुटुंब सावरणे हिच रक्षाबंधनाची भेट
कै.दत्तात्रय मनोहर गुंड यांच्या विधवा पत्नीने परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांना राखी बांधली. या प्रसंगी बोलताना मंत्री सरनाईक अत्यंत भाऊक झाले आणि या पीडित भगिनीच्या कुटुंबाचे सांत्वन करताना पिडीत भगिनींचे कुटुंब सावरणे हिच माझी रक्षाबंधनाची सगळ्यात मोठी भेट असेल,असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
यावेळी खामसवाडी गावचे सरपंच अमोल पाटील, तहसिलदार हेमंत ढोकळे , ग्रामस्थ व शासकीय अधिकारी उपस्थित होते.