आ.जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जो राडाघातला तो- आ.राणा पाटलांचेच कटकारस्थान ?
तुळजापूर शहरात अजूनही ड्रग्ज विक्री चालूच काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांचा दावा
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात मंगळवारी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे मंदिरात दर्शनासाठी व मंदिर पाहणीसाठी आले असता, भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना जोरदार विरोध करत निदर्शने केली होती. याबाबत आता महाविकास आघाडीकडून प्रतिउत्तर देण्यात आले असून, या घटनेचा महाविकास आघाडीने जाहीर निषेध केला आहे. तसेच तुळजापूर शहरात अजूनही ड्रग्स विक्री सुरूच असल्याचा खळबळजनक दावा करीत हे सर्व कटकारस्थान आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी केले आहे. असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केला. मंगळवारी सायंकाळी आमदार जितेंद्र आव्हाड हे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मंदिरात सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी केली. तसेच मंदिराचा मुख्य गाभारा व शिखर काढण्यासंदर्भात विरोध
दर्शवला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवत घोषणाबाजी केली होती. याबद्दल महाविकास आघाडीने आता जशास तसे उत्तर देण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हळद उधळली असली तरी आम्ही देखील यापुढे तोंडाला बुक्का लावणार असल्याचा इशाराही महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला. यावेळी तहसीलदार तथा धार्मिक व्यवस्थापक देखील गैरहजर होते. तसेच मंदिर संस्थानने चूकीची वागणूक देत आडवा आडवी देखीलकेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,क्रॉसेचे युवा नेते ऋषिकेश मगर, अमोल कुतवळ, सुधीर कदम, माजी नगरसेवक राहुल खपले, अमर चोपदार, नरेश पेंदे, तौफिक शेख, मधुकर शेळके, किरण यादव, अक्षय कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
जितेंद्र आव्हाड येत असल्याने भाजपकडून येथे आंदोलन होईल याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. मात्र तरी देखील पोलीस प्रशासनाने याबाबत कोणतीही कठोर भूमिका घेतली नाही. तसेच बंदोबस्तही अपुरा ठेवल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. पोलिसांची एकूणच भूमिका संशयास्पद असल्याचे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे.