तलवार व कोयत्याने मारहाण प्रकरणातील ; मा.जिल्हा व सत्र न्यायालयाकडून एकास जामीन मंजूर – ॲड, विशाल साखरे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
उमरगा शहरात घडलेल्या गंभीर प्राणघातक हल्या प्रकरणात ठेकेदारी वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्या संदर्भात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला
होता.जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, उमरगा येथे दिनांक १५/०४/२०२५ रोजी सुझुकी शोरूम समोर,एस.बी.आयच्या एटी.एम च्या जवळ दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास एका सिल्वहर रंगाच्या ईरटीका कारमधुन आलेल्या चार अनोळखी इसमांपैकी तीन इसमांनी कारमधुन उतरून रस्त्यावरून चाललेल्या एका स्कुटी चालकास अडवुन त्यांने धारदार हत्यारांनी स्कुटी चालकाच्या डोक्यात व हातावर मारुन गंभीर जखमी केले होते. त्या नुसार उमरगा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९,१२६ (२), ३(५) व शास्त्र अधिनियम १९५९, कलम ४,२५ अन्वये गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्यात ४ पैकी ३ आरोपी इतर आरोपींनी कट रचून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणात
व्यंकट धोत्रे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज व शुभम अंबुलगे यांच्या रेगुलर जामीन अर्जावर दि.२९ जूलै रोजी सुनावणी झाली आरोपीचे वकील ॲड विशाल साखरे,मा.न्यायालयात आरोपी शुभम अंबुलगे हा घटने दिवशी गुलबर्गा कर्नाटक राज्य येथे दुसऱ्या राज्यात होता. व त्यास हद्दपार करण्यात आले होते. व आरोपी व्यंकट धोत्रे हे घटनेचे आधल्या दिवशी हैदराबाद येथून विमानाने गोव्याला गेले होते.ते घटनेच्या दुसऱ्या दिवशी हैदराबाद येथे आले होते. त्याबाबत त्यांनी आरोपी हा घटनेच्या वेळी दुसरी कडे हजर असले बाबत सक्षम कागदोपत्राचे पुरावे तसेच विमानाचे बुकिंग तिकीट सादर करून त्या बाबत मा.मुंबई उच्च न्यायालयाचे दाखले सादर केले. तसेच पोलिसांनी आरोपीवर कट रचल्याचे आरोप देखील केले होते. त्या बाबत ॲड. विशाल साखरे यांनी कट रचले संदर्भात कोणताही सक्षम पुरवा सरकार पक्षाकडे दिसत नसल्याचे युक्तिवादात सांगितले. व त्या बाबत मा.उच्च न्यायालयाचे दाखले सादर केले. तसेच घटना हि दिनांक १५/०४/२०२५ रोजी घडून पोलीस त्याच दिवशी घटनास्थळी जाऊन देखील पोलिसांनी प्रथमखबर एफआयआर हा दिनांक १९/०४/२०२५ रोजी म्हणजेच तब्बल ४ दिवस उशिरा नोंदवला असून तपास यंत्रणे बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तसेच केवळ आरोपी वर पूर्वीचे गंभीर गुन्हे असले तरी जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत. नाहीत तो पर्यंत आरोपीस गुन्हेगार म्हणता येत नाही. व तो जामीन नाकारण्याचा कारण होत नाही त्या साठी ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी उच्च न्यायालयाचे दाखले दिले. या सर्व बाजूचे अवलोकन करून मा.न्यायालयाने आरोपी व्यंकट धोत्रे यांना अटक पूर्व जमीन व आरोपी शुभम अंबुलगे याला रेगुलर जामीन मंजूर केला. आरोपी ओंकार चौधरी यांस अटक पूर्व मंजूर केला सदर प्रकरणात ॲड. विशाल साखरे,ॲड,मंजुषा साखरे,ॲड, महेश लोहार,ॲड. शुभम तांबे,ॲड,अमित गोळे,ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड.अर्चना कांबळे,ॲड,उदय आडेकर,ॲड संकेत गोरे, महेश पवार, रोहित लोमटे यांनी सहकार्य केले.