दयावान युवा मंच कार्यकारिणी जाहीर;अध्यक्षपदी अपेक्षीत साखरे तर उपाध्यक्षपदी निखील इंगवे !
दयावान युवा मंच वर्गणी मुक्त गणेश मंडळाचेखास आकर्षण…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहरातील दयावान युवा मंच वर्गणी मुक्त गणेश मंडळ, दवायावत नगर तुळजापूर मंडळाची बैठक मंडळाचे आधारस्तंभ तथा माजी नगरसेवक विजय कंदले तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले व दयावान युवा मंच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मिथून पोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनमते मंडळाच्या अध्यक्षपदी अपेक्षीत, साखरे,उपाध्यक्षपदी निखील इंगवे, कोषाध्यक्षपदी विनायक वाघमारे,सहकोषाध्यक्षपदी अभिजीत जाधव,कार्याध्यक्षपदी कुनाल रोंगे,दादाराव गोरे यांची निवड करण्यात आली.
ज्येष्ठ सदस्य राजूमामा सातपुते, अस्तिक साखरे,अशोकराव जाधव,अनिल पोफळे, छबिलाल परदेसी,नेताजी देवकर,कलीम शेख,मधुकर सूर्यवंशी,विठ्ठल चौगुले,अविनाश भोरे,दीदार मुलांनी,सुरज गायकवाड,विकास चौगुले,युवराज शिंदे,रतन गरड, ओमकार इगवे,भैरवनाथ रोटे, शिवाजी देवकर,नितीन गुंजाळ, राजू चव्हाण,राहुल शिरसागर,अमर गुंडगिरी, बाजीराव शिंदे,उमेश देवकर, धीरज नरसोडे ,गोपाळ जाधव, पिंटू नरसोडे,जावेद शेख तसेच
यावेळी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.दयावान युवा मंच मंडळाच्या स्थापनेला या वर्षी २० वर्ष पूर्ण झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे अतिशय भव्य दिव्य अशी १८ फुटाची गणेश मुर्ती व तसेच सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम घेण्याचा सर्वांनी मानस केला आहे. तसेच यावर्षीच्या उत्सवात जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पने नुसार एक सदस्य एक वृक्ष, अन्नदान,स्त्रीभ्रूण हत्या व समाजउपयोगी विशेष कार्यक्रम राबवण्यात येईल असे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मिथुन पोपळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दयावान युवा मंच मंडळाच्यावतीने पैठणी सहीत लाखोंची बक्षिसे…
गणेश उत्सव म्हटलं कि दयावान मंच युवा मंडळाच्यावतीने महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित केले जातात.या कार्यक्रमांमध्ये होम मिनिस्टर, डान्स, गायन, संगीत खुर्ची, लंगडी असे काही मजेशीर खेळ खेळले जातात. आणि अर्थातच विजेत्यांना आकर्षक बक्षिसं हि ठेवले आहेत. काही महिला अक्षरश: जीव तोडून खेळतात.
होम मिनिस्टर स्पर्धेतील लोकाची बक्षिसे.
स्त्रीभ्रूणहत्या ;बेटी बचाव बेटी पढाव जनजागृती…
स्त्रीभ्रूणहत्या १८ फुटी गणेश मुर्तीच्या माध्यमातून दाखवीण्यात येणार आहे. अशी खास आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली आहे.
स्त्रीभ्रूणहत्या भारतात हा कायदा बेकायदेशीर आहे. ही एक सामाजिक समस्या आहे ज्यामुळे समाजात वेगवेगळ्या लिंगांना अन्याय्य वागणूक मिळते. गणेश मंडळाच्या वतीने स्त्रीभ्रूणहत्या ;बेटी बचाव बेटी पढाव गणेश मूर्तीच्या माध्यमातून जनजागृती…