आ.जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जो राडाघातला तो- आ.राणा पाटलांचेच कटकारस्थान -काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदिराचा गाभारा या विषयावरून तुळजापुरात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्यामुळे मोठापेच प्रसंग प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. रविवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर निदर्शने करून त्यांना जाब विचारला त्यानंतर पुन्हा तुळजापूर येथील स्थानिक महाविकास आघाडीचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या भारतीय जनता पार्टीचे निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रति प्रश्न विचारला आहे. मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन गाभारा काढण्याविषयी अद्याप राज्य पुरातत्त्व खात्याकडून कोणताही अहवाल प्राप्त झाला नाही असा निर्मला दिला आहे.
सर्वसाधारणपणे तुळजाभवानी मंदिर विकास करणे आणि तुळजाभवानी देवीचा गाभारा आणि शिखर काढणे यावरून मोठे राजकारण तयार झाले आहे याविषयी अफवा आणि उलट सुलट चर्चा देखील सुरू आहेत पूर्वीपासून राज्य पुरातत्व खात्याचा अहवाल आणि केंद्रीय पुरातत्त्व खात्याचा अहवाल घेऊन मंदिराचा गाभारा आणि मंदिर परिसराचा विकास केला जाईल असे सांगितले गेले होते परंतु कोणत्या कारणांनी मंदिर गाभारा काढला जाणार आहे मंदिराचे शिखर देखील काढले जाणार आहे असे समजले आणि त्यावरून भाविक भक्तामध्ये चुकीचा संदेश गेला.
याविषयी स्थानिक राजकीय पटलावर देखील त्याचे पडसाद उमटले सत्ताधारी आणि विरोधक महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू झाला. तुळजापूरचे ड्रग प्रकरण आणि या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून जामीन मिळालेले विनोद गंगणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा स्वागत केलं आणि आमदार पाटील यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी 1865 कोटी निधी दिला आणि हा निधी मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या उतराईसाठी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन समस्त तुळजापूरकर म्हणून करण्यात आले होते.
हा सत्कार करण्यासाठी समस्त तुळजापूरकर म्हटले गेले होते परंतु भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व या सत्कार समारंभावर दिसून आला त्यामुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला असावा असा देखील अंदाज व्यक्त होत आहे. याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी तुळजापुरात आल्यानंतर त्यांच्यासमोर निदर्शने करण्यासाठी गोंधळ घातला गेला असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीचे नेते धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. यानंतर महाविकास आघाडीचे कोणतेही नेते तुळजापुरात आल्यानंतर असा प्रकार जर झाला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ कमी पडणार नाही असा गर्भित इशारा देखील काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी दिला आहे.
याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते ऋषिकेश मगर यांनी आमच्या वाडवडिलांनी अनेक प्रसंगांमधून तुळजाभवानी देवीचे मंदिर सुरक्षित ठेवले आहे. केवळ सहा वर्षांपूर्वी आमदार झालेल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मंदिराच्या विषयी आम्हाला जास्त शिकवू नये अशी देखील विधान काँग्रेस नेते ऋषिकेश मगर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांना तुळजापुरात मिळालेली वागणूक याविषयी दिलगिरी व्यक्त करून झालेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे आमदार पाटील यांनी वेगवेगळ्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काय सांगितले होते हे त्यांनीच पहावे आणि नंतर मंदिर पाडणे विषयी कोण बोलले आहे याविषयी खुलासा करावा असे देखील या पत्रकार परिषदेमध्ये ऋषिकेश मगर यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तुळजापुरात दर्शनासाठी आलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर केलेली गुंडगिरी चुकीची आहे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीच हे घडवून आणले आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आम्ही देखील आमदार पाटील यांना अडवून जाब विचारू शकतो त्यांनी इतर पक्षाला कमी समजू नये असा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे. भारतीय जनता पार्टीने हे सर्व प्रकार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर निदर्शने करून घडवून आणले आहेत असा देखील संशय तालुका अध्यक्ष पाटील यांनी बोलून दाखवला आहे.या प्रकरणाशी संबंधित माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे कोणता पुरावा आहे तो अगोदर त्यांनी दाखवावा ज्यामध्ये मंदिर पाडले जाणार आहे शिखर पाडले जाणार आहे असा उल्लेख आहे आणि मग तुळजाभवानी मंदिराची विषयी विधान करावे कोणत्याही चुकीच्या माहितीच्या अधिकाऱ्याने तुळजाभवानी मंदिराचे बदनामी करू नये. त्यांनी काल इथे पत्रकार परिषद घेऊन जे बोलले ते कोणताही आधार नाही असा देखील ठपका माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी ठेवला आहे. प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनी देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे तुळजापूरला बदनाम करणारी आहे आणि कोणतेही कारण नसताना त्यांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे याविषयी त्यांनी योग्य ते स्पष्टीकरण दिले पाहिजे अन्यथा आम्ही आगामी काळात तुळजापूरची बदनामी सहन करणार नाही असा इशारा दिला आहे.तुळजाभवानी देवीचा प्राचीन इतिहास लक्षात घेता आणि तुळजापूरचे सर्व अर्थकारण लक्षात घेता मंदिराचा विकास करणे अत्यंत गंभीर विषय आहे याविषयी सर्व पक्षाची सहमती असणे अत्यंत आवश्यक आहे प्रशासनाने यापूर्वी याविषयी कोणतेही पाऊल उचललेले नाही केवळ कागदोपत्री सूचना करा अशाच प्रकारचे नियोजन केलेले आहे. यामध्ये पक्षी या भेदाभेद देखील दिसून येतात मंदिर विकासाच्या आणि एकूणच विकासाच्या प्रश्नावर राजकीय देखील मतभेद असता कामा नये याविषयी देखील खबरदारी तुळजापुरात घेण्याची अत्यंत आवश्यकता या निमित्ताने निर्माण झाली आहे. तुळजापूर मंदिराचा विकास हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे याविषयी शंकाच नाही. तुळजापूरला खूप मोठा प्राचीन इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा देणारी तुळजाभवानी देवी असा देखील लौकिक तुळजापूरचा आहे याविषयी देखील तुळजाभवानी मंदिर संस्थांचे सर्व पदाधिकारी विश्वस्त अध्यक्ष आणि सदस्यांनी आगामी काळात घेतला पाहिजे.आपली भूमिका स्पष्ट नसल्यामुळे देखील गैरसमज निर्माण होतात अनेक वेळेला अफवा पसरतात आणि त्यामधून असे पेचप्रसंग तयार होतात हा जुना अनुभव असताना देखील याविषयी खबरदारी घेतलेली दिसत नाही. राज्य सरकारने यापूर्वी १८६५ कोटी रुपये निधी विकास कामासाठी मंजूर केला आहे त्यानंतर विकास कामाचे नियोजन सुरू असताना याविषयी वेळोवेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु यामधून कोणतेही स्थानिक पुजारी व्यापारी नागरिक यांची समाधान झालेले नाही त्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज आणि अफवा पसरविला जात आहेत आगामी काळात या विषयावर प्रशासनाकडून अधिकृत कोणती भूमिका जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.