तुळजापूर ड्रग्स प्रकरणी अभिजित अमृतराव यांना न्यायालयकडून अटकपूर्व जामीन मंजूर – ॲड अमोल वरूडकर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथील एम.डी. ड्रग्स प्रकरणातील आरोपी अभिजीत अमृतराव याचा जिल्हा व सत्र न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर आतापर्यंत या प्रकरणात एकूण ३८ संशयित आरोपी निष्पन्न झाले असून त्यामध्ये २० जणांना अटक झाली आहे तर ७ जनाचा जामीन झाला आहे.ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात ३८ आरोपी असुन अलोक शिंदे, उदय शेटे, विनोद उर्फ पिटू गंगणे, रणजीत पाटील, शुभम नेप्ते, दुर्गेश पवार, राजू उर्फ पिट्टा सुर्वे या ८ आरोपीना जामीन मिळाला आहे. २ पोलीस कोठडीत ८ आरोपी फरार असुन २० आरोपी धाराशिव येथील कारागृहात आहेत..
यानंतर या प्रकरणात अटक असलेले संशयित आरोपी अभिजित अमृतराव यांना जामीन मंजूर झाला असून त्यामुळे त्यांच्या समर्थकात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.गु.र.नं. 22/2025 तामलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.आरोपी क्रमांक 31 अभिजीत अमृतराव च्या वतीने ॲड. अमोल वरुडकर यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. ॲड. अमोल वरुडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला तसेच आर्थिक व्यवहाराची खरी वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडली, ॲड. अमोल वरुडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अभिजीत अमृतराव याचा नियमित जामीन जिल्हा न्यायालयाने मंजूर केला.पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ॲड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.