धाराशिव तालुक्यातील करजखेडा – पाठोदा येथील जमिनीच्या वादातून पती-पत्नीचा निघृण खून,आरोपी फरार
पोलीस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील करजखेडा – पाठोदा परिसरात बेंबळी पोलीस ठाण्याच्याहद्दीत जमिनीच्या वादातुन जुन्या भांडणाची कुरापत काढून पती पत्नीचा निघृण खुन केल्याची घटना दि.१३ ऑगस्ट रोजी
करजखेडा पाटोदा चौकात घडली आहे.सहदेव व प्रियांका पवार या पती पत्नीचा निघृण खुन करण्यात आला आहे.सुरुवातीला गाडीने धडक देऊन नंतर
कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.संशयित आरोपी जीवन चव्हाण, हरिबा चव्हाण या बाप लेकासह अन्य जणांनी मिळून हे हत्याकांड केले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सहदेव हे १५ दिवसापूर्वीच जामीनावर बाहेर आले होते. विशेष म्हणजे आरोपी व मयत सहदेव यांचा जमिनीचावाद होता, त्या जमिनीच्या वादातुन सहदेव याच्यावर ३०७ चा गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्यांना ४ वर्षाची शिक्षा झाली होती.त्यानंतर गेली अनेक वर्ष सहदेव हे जेलमध्ये होते त्यांना छत्रपती संभाजीनगर
उच्च न्यालयाने त्यांना गेल्या १५
दिवसापुर्वी जामीन मंजुर झाला होता त्यानंतर ते गावात आले, नंतर पूर्वीचा वादातून बदला घेण्यासाठी पती -पत्नीची हत्या करण्यात आली. सहदेव यांच्यावर जवळपास दहा वार करण्यात आले असून
पती पत्नीच्या हत्यानंतर त्यांच्या पश्चा वृद्ध आई वडील तसेच त्यांची पहिली व तिसरीला असलेल्या दोन मुली पोरक्या झाल्या आहेत.
पत्नीचा हाक नाहक बळी गेला त्यांच्या नरड्यावर वार करण्यात आले जागीच मृत्यू झाला तर सहदेव यांचा धाराशिव येथे आल्यावर मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे करजखेडा गावावर शोककळा पसरली आहे.