अंमली पदार्थांचा व्यसन ड्रग्जफॅक्ट्स पथनाट्य व रम्मी नावाचा डाव खेळताना;शिवसेना उबाटागटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गैरमार्गाने केले आंदोलन !
टाळू अंमली पदार्थांचे सेवन वाचऊ तरुण पिढीचे जीवन..का ? पथनाट्य करून तरुण पिढीचे नासऊ जिवन ? – ॲड विशाल साखरे
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव शहरात शिवसेना उभाटागटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गैरमार्गाने केल आंदोलन…आंदोलन करण्याचा अधिकार व कर्तव्य दक्षतेपासून स्वतः लोकप्रतिनिधी असताना कार्यकर्त्यांना प्रवृत्त करून बेकायदेशीर आंदोलनकर्त्यांना समर्थन करणे म्हणजे कायद्यानुसार होऊ शकत नाही! मत मांडणे व्यक्ती स्वातंत्र्य बाबतीत दुमत नाही!
वास्तविक कोणत्याही विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सत्ताधारी पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड,विशाल साखरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कायद्याच्या चौकटीमध्ये ॲड, साखरे यांची प्रतिक्रिया आहे. किंवा नाही याची अवलोकन करणे वैयक्तिक स्वतःची जबाबदारी आहे ! त्यामुळे राजकीय हेतू बाळगून ही प्रतिक्रिया देत नाही. परंतु आपण विरोधाला विरोध म्हणून जे काही लोकांच्या नजरेमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी करत आहात ती गोष्ट गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे ! …..
वास्तविक लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या तरतुदीचा व घटनेच्या तरतुदीचा योग्य रित्या आदर व सन्मान करून त्याचे पालन
करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र आपण संविधानिक मार्गाने आपले आंदोलन अथवा मत व्यक्त करणे याबाबत सहमत आहे ! परंतु आपल्या आंदोलनामुळे एखाद्या समाज व्यवस्थेतील नागरिकांना त्याबाबत दुष्परिणाम होऊ शकतो याची जबाबदारी स्वीकारून घटनात्मक मार्गाने आंदोलन करणे आवश्यक आहे.?
दि.११ ऑगस्ट रोजी धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उबाठा गटाचे आमदार तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेले आंदोलन म्हणजे NDPS कायद्याअंतर्गत व्यसनाधीनतेसाठी त्यांनी केलेली प्रात्यक्षिक व कृती म्हणजे व्यसनाधीनतेला लोक परिसरामध्ये प्रवृत्त करून गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देऊन आमदार कैलास पाटील यांनी पूर्वकट रचून धाराशिव जनतेला एखाद्या लोक परिसराच्या ठिकाणांमध्ये व्यसनाधीन होण्यासाठी कशा पद्धतीने ड्रग्सचे सेवन केले जाते याबाबत प्रवृत्त केले असल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून तुळजापूर ड्रग्स प्रकरणात पोलीस यंत्रणेवर दबाव आणून तसेच पब्लिक नुसेन्स आणि लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करण्याचे कृत्य केले असल्याने व जिल्हाधिकारी कार्यालय समोर पब्लिक प्लेस मध्ये आपले कार्यकर्ते जमवून बेकायदेशीर कृती केली या बाबत…. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन काय कार्यवाही करणार ? असा सवाल संबंधित प्रशासनाला सत्ताधारी पक्षाचे ॲड,विशाल साखरे जिल्हा प्रवक्ते यांनी सडेतोड विचारला आहे.
तसेच त्याबाबत सोशल मीडिया वरती आपल्या कार्यकर्त्यामार्फत सदरील गुन्हेगारी गोष्टीसाठी प्रवृत्त करून प्रात्यक्षिक दाखवून धाराशिव मधल्या जनतेला व तसेच सबंध महाराष्ट्र मधल्या जनतेला ड्रग सेवनाच्या प्रात्यक्षिक नमुना दाखवून तुळजापूर ड्रग्स प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांना ड्रग्स सेवन करण्यासाठी प्रवृत्त करून अतिशय गंभीर स्वरूपाचा कट रचला असल्याने सदरील आंदोलनाची पोलिसांमार्फत चौकशी होऊन तात्काळ सदरील समाज विघातक व्यसनाधीन कृती प्रसार मध्यमा द्वारे प्रतिबंध करून सायबर विभाग मार्फत प्रतिबंधात्मक कार्यवाही होणे अपेक्षित ? आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार परंतु घटनेच्या तरतुदीचे उल्लंघन करून तसेच कायद्याच्या कक्षेत न बसणारे आंदोलन ज्यामुळे समाजातील लहान मुले व्यक्ती व महिला व तसेच समाजातील सर्व घटक यांच्यावरती विघातक परिणाम होणारे कृत्य हे सोशल मीडियावरती प्रसार माध्यमाच्या वतीने प्रसिद्ध करून कायद्याचे उल्लंघन केले. या बाबत प्रशासन काय भूमिका घेणार ? आंदोलनकर्त्यांना पाठीशी घालणार असा सवाल केला आहे.
सदर आंदोलनाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन म्हणजेच वास्तविक संबंधित कार्यक्षेत्रामध्ये जे आंदोलन करण्यात आले त्याबाबत पोलीस प्रशासनाला आंदोलनाचे स्वरूप ? व तसेच आंदोलनाचे नियोजन? व त्याचप्रमाणे आंदोलन कोणत्या प्रकारे करण्यात येणार आहे? या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना दिलेली आहे. का? तसेच सदरील आंदोलनामध्ये आंदोलनात पत्ते खेळणे व ड्रग्स ओढण्याचे पथनाट्य करण्यात येणार आहे. याबाबत पूर्व कल्पना पोलिसांना दिलेली आहे का ? तसेच सदरील आंदोलनाच्या अनुषंगाने आंदोलन करणार व त्याची जबाबदारी घेणार लोकप्रतिनिधी यांनी या आंदोलनाचा जनतेने विपर्यास व दुष्परिणाम या दृष्टिकोनाने विचार न करता दाखवण्यात येणारे सर्व पथनाट्य हे केवळ व्यसनाधीन गोष्टीसाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रवृत्त करणारे कृती नाही याबाबत लेखी हमीपत्र दिलेले आहे का?. हे पोलीस प्रशासनाने म्हणजेच पोलीस अधीक्षक व त्यांच्या कार्यक्षेत्राखाली कार्यरत असणारे जबाबदार पोलिस अधिकारी यांनी सर्व जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे. तसेच सदर करण्यात आलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने या सर्व बाबी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट झालेल्या असताना पोलीस यंत्रणा याबाबत काय निर्णय घेणार याची देखील तसदी घेणे आवश्यक आहे ! आंदोलन हे वास्तविक कोणत्या माध्यमातून केली पाहिजे याची योग्य ती संकल्पना व घटनात्मक अधिकार व कायदेशीर सर्व बाबी या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिक यांना माहीत असणे हे कायद्याचे गृहीतक आहे. त्यामुळे कोणतीही कृती करत असताना कायद्याच्या पुढे कोणतेही शहाणपण दाखवणे म्हणजे कायद्याला आव्हान करणे?
नेत्यांना खुश करण्यासाठी कार्यकर्त्यांना संभ्रमित करून चुकीचे आंदोलन करणे म्हणजे शुद्ध हुशारीचा मूर्ख पण! आणि प्रामाणिक व निष्पाप कार्यकर्त्याना समाजाप्रती भडकावणे होय!
तसेच ॲड,साखरे यांचा आमदार कैलास पाटील यांना खास करून प्रश्न आहे की माननीय स्वर्गीय आदर्श वादी महाराष्ट्राचे प्रेरणा स्थान म्हणजे हिंदुहृदय सम्राट परमपूज्य “श्री बाळासाहेब ठाकरे ” हे आज ही माझे दैवत आहे. आमदार साहेब तुम्ही शिवसेनेत येण्या अगोदर शिवसैनिक म्हणून मी विद्यार्थी सेने पासून काम केले आहे.
इतिहास वाचायचं असेल तर शिवसेना उबाठा गटाचे धाराशिव जिल्ह्याचे सचिव प्रवीण कोकाटे यांना विचारा कारण ते मूळ शिवसैनिक आहेत ! कारण मी देखील मा.बाळासाहेबांच्या विचारणा प्रेरणा स्थान देऊन सैनिक म्हणून काम केले आहे. मला आज देखील शिवसैनिक अतिप्रिय आहेत. किती दिवस प्रामाणिक शिवसैनिकांनी सोसायचे?
ॲड, साखरे माननीय अजित दादा पवार साहेब यांचे विचार आवडले कारण ते लोकांनसाठी काम करण्याची जिद्द ठेवणारे नेते आहेत. म्हणून मी त्यांच्या नेतृत्वात काम करणे योग्य समजले. कारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण ते ही समाज हितासाठी बाळगणारे माझे नेते म्हणजे सन्मानीय अजित पवार साहेब म्हणजे शब्द जरी तिखट असले तरी कार्यकर्त्या विषयी आणि जनते विषयी जबाबदारी स्वीकारून काम करणारा नेता आहे!
आपणही राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना पक्षात आलात हे आपण नाकारू शकत नाहीत. मग उगाच कशाला लोकात संभ्रम निर्माण करता. आपण लोक प्रतिनिधी आहात. माझ्या मतदार संघाचे आहात. आपण कधी जबाबदारी स्वीकारणार? आपल्या मतदार संघ आपण विकास कामे करण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.असा आमदार कैलास पाटलांना
ॲड. विशाल प्रभाकर साखरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते यांनी सवाल केला आहे.